Homeताज्या बातम्यादेश

भारत-पाक सामन्याची क्रेझ शिगेला अहमदाबादमध्ये हॉटेलचे भाडे 1 लाखांपर्यंत

अहमदाबाद - आयसीसी वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हा ऐतिहासिक विश्वचषक यंदा भारताच्या भुमीवर खेळवला जाणार आहे. हा विश्वचषक ५ ऑक्टो

विनोद कांबळीची पत्नीसह मुलाला मारहाण
कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक
जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पहिल्याच दिवशीच्या सामन्यांत खेळाडूंची रोमहर्षक चढाई

अहमदाबाद – आयसीसी वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हा ऐतिहासिक विश्वचषक यंदा भारताच्या भुमीवर खेळवला जाणार आहे. हा विश्वचषक ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा ४६ दिवसांची असेल. ५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होईल. वर्ल्डकपला आणखी तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण वर्ल्डकप शेड्यूल रिलीझ झाल्यापासून अहमदाबादमधील हॉटेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे प्रेक्षकांना वर्ल्डकप चांगलाच महागात पडू शकते. एका मीडिया रिपोर्टनुसार, तीन महिन्यांआधी हॉटेल बुक केले तरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी पंचतारांकित हॉटेल ५० हजार रुपये भाडे आकारत आहेत. वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर होण्याआधी हॉटेल रुमचे भाडे ६,५०० ते १०,५०० रुपयांपर्यंत होते. विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यानंतर १५ ऑक्टोबरला भारत-पाक सामना आणि त्यानंतर अंतिम सामनाही येथेच होणार आहे. आयटीसी नर्मदाचे महाव्यवस्थापक मॅकेन्झी यांनी सांगितले की, “१५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठीही खूप उत्सुकता आहे. १३ ते १६ ऑक्‍टोबरदरम्यानचे बुकिंग आधीच झाले आहे. मॅचचे दिवस जवळ येतील तसे रुमचे भाडे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, हयात रेसीडेन्सी अहमदाबादचे महाव्यवस्थापक पुनीत बैजल यांनी सांगितले की, “सामना ज्या दिवशी आहे त्या दिवशीच्या जवळपास ८० टक्के खोल्या बुक झाल्या आहेत. उद्घाटन समारंभ आणि न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड आणि प्रमुख ट्रॅव्हल एजन्सीद्वारे बुकिंग करण्यात आली आहे. सोबतच उद्योग क्षेत्रातील सुत्रांच्या माहितीनुसार , बेसिक श्रेणीतील खोलीची किंमत सुमारे ५२ हजार रुपये असू शकते. प्रीमियम श्रेणीतील खोल्यांची किंमत १ लाख रुपयांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये वर्ल्डकपचे सामने पाहणे चाहत्यांच्या खिशाला भारी पडू शकते.

COMMENTS