Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम

नांदेड :भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त  नांदेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात

डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबई निळ्या प्रकाशाने उजळून निघाला!

नांदेड :
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त  नांदेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरातील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा समाजाने अंगीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS