Homeताज्या बातम्या

‘ज्ञानगंगा’च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगावचे चौघे ‘टॉप टेन’ मध्ये 

कोपरगाव शहर : ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेअंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रभरातील इयत्ता १२ वी सायन्स विद्यार्थ्यांकरता नवीन परीक्षा पद्धतीवर

महिला पोलिसाला मारहाण
दफनविधीनंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला !व्हॉट्सॲपवरील फोटोने उलगडले रहस्य;  प्रशासनापुढे पेच
कर्जत नगरपंचायतच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी  

कोपरगाव शहर : ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेअंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रभरातील इयत्ता १२ वी सायन्स विद्यार्थ्यांकरता नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित राज्यस्तरीय बोर्ड पूर्व लाईव्ह परीक्षा घेतली जाते आणि त्यात राज्यभरातून पहिल्या येणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे स्कॉलरशिप दिली जाते. यावर्षी या टॉप दहा विद्यार्थ्यांमध्ये कोपरगाव तालुक्यातून चार विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. त्यापैकी संजीवनी ज्युनिअर कॉलेजमधील समृद्धी विजय शेळके(चतुर्थ क्रमांक), वैभव नारायण लचके(सातवा क्रमांक) तसेच श्री गणेश ज्युनिअर कॉलेज कोऱ्हाळे येथील धनंजय मंगेश बिडवे(सहावा क्रमांक) आणि मारुतीराव दगडूजी तिडके पाटील ज्युनिअर कॉलेज चासनळी येथील वैष्णवी पवनकुमार चांदगुडे(नववा क्रमांक) मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. विद्यार्थ्यांंना प्रा.तनेश लोंगाणी यांचे मार्गदर्शन मिळाले.राज्यभरातील टॉप टेन मध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्तीची रक्कम प्रा.नितीन बानगुडे पाटील व इतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. सदरचा बक्षीस वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ सासवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृह या ठिकाणी ३० जून रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रमुख अनिल साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमात ज्ञानगंगा एज्युकेशनचे अध्यक्ष संतोष आरकस, अहिल्यानगर जिल्ह्यातून शुभम आरकस,गौतम राऊत, साळवे आदींसह शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राणे यांनी तर आभार पुरंदर हायस्कूल व जुनिअर कॉलेज सासवडचे प्राचार्य सय्यद यांनी मानले.

COMMENTS