Homeताज्या बातम्या

जामखेडमधील ६२ कैद्यांना नाशिकला हलवले  जामखेड दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद

जामखेड : जामखेड कारागृहात न्यायालयीन कोठडी साठी असलेले दुय्यम कारागृह शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. या कारागृहांतील ६२ कैद्यांना पोली

म.फु.कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र समिती स्थापन होणार 
विश्वकर्मा परिवारातर्फे रविवारी शिर्डीत पुरस्कार वितरण; समाजरत्न आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळ सत्रात भरवाव्यातअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जामखेड : जामखेड कारागृहात न्यायालयीन कोठडी साठी असलेले दुय्यम कारागृह शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. या कारागृहांतील ६२ कैद्यांना पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. यापुढे जामखेड येथील न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेल्या कैद्यांना नाशिक येथेच ठेवण्यात येणार आहे.राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच जीर्ण अवस्थेतील कारागृहांचा विचार करून महाराष्ट्रातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कारागृहांची इमारत जीर्ण झाल्याने तसेच कैदी पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कारागृहांतील सर्व कैद्यांना जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याच निर्णयाची अंमलबजावणी करत जामखेड येथील दुय्यम कारागृहातील एकूण ६२ आरोपींना ९ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलिस वाहनांच्या ताफ्यातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. या आरोपींमध्ये ५९ पुरुष आणि ३ महिला आरोपींचा समावेश होता. स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जामखेड कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. या स्थलांतर प्रक्रियेदरम्यान सर्व प्रशासकीय व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS