Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदयनराजे आज रायगडावर करणार आत्मक्लेश

सातारा प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उमटली असून, शिवरायांच्या सन्म

खासदार उदयनराजे राज्यपालांवर संतापले
उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचे सडेतोड उत्तर
उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!

सातारा प्रतिनिधी – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उमटली असून, शिवरायांच्या सन्मानार्थ शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले हे आत्मक्लेश करणार आहेत. यासाठी शिवरायांचे समाधीस्थळ असलेल्या रायगडावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी ’निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सातार्‍यात पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी या मेळाव्याची आणि आत्मक्लेश करणार असल्याची माहिती दिली. उदयनराजे म्हणाले, मी माझ्या उदयन या नावापुढं राजे लावतो कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आम्हाला सन्मान मिळाला. त्यामुळे हा केवळ त्यांचाच अपमान नाही, अनेक महापुरुषांची देखील काही लोक अपमान करत आहेत. हा अपमान मी कदापी सहन करु शकत नाही आणि का करावा? असा सवालही त्यांनी यावेळी केला. कुठल्याही चांगल्या कार्याला सुरुवात करताना आपण शिवाजी महाराज आणि महारापुषांची नाव घेतो आणि त्यांच्यावरच अशी चिखलफेक होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आमच्या वेदना मांडण्यासाठी आम्ही आता रायगडाकडे निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आम्ही ’निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

आपण इतके कोडगे झाले आहोत का? – छत्रपती शिवरायांचा सन्मान म्हणजे सर्व महापुरुषांचा सन्मान. मात्र राज्यपाल एकदा नव्हे तर अनेकदा शिवरायांचा अवमान करतात. जग इतके व्यक्तीकेंद्रीत झाले आहे का ? त्याच्यापुढे कोणाला काहीही दिसत नाही. आपण इतके कोडके झाले आहोत का? शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणजे सर्व महापुरुषांचा सन्मान आहे. याप्रकरणी आपल्याला मुख्यमंत्र्यांचा आणि इतर कोणाचाही फोन आलेला नाही. कोणीही माझ्याशी बोललेले नाही आणि मी कोणाच्या फोनची वाटही बघत नाही. त्यांना जे योग्य वाटतंय ते करतात आणि मला जे वाटते ते मी करतोय, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सत्ताधार्‍यांवरही नाराजी व्यक्त केली.

COMMENTS