Homeताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर आज ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : राज्यात एकीकडे शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा पुन्हा चर्चेतपक्षीय बैठका, खासदारांशी चर्चा आणि नव्या समीकरणांची उत्सुकता
बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावामतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
दिलेला शब्द पाळला! उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आदिल शाह कुटुंबाला नवीन घरपहलगाम हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राणार्पण; युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
Matoshree Meeting June 14: Thackerays Strategy Amidst Operation Tiger

मुंबई : राज्यात एकीकडे शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी, १४ जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी महायुतीतील काही नेत्यांकडून ठाकरे गटातील काही खासदार संपर्कात असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही विविध प्रसंगी अशा हालचालींचा उल्लेख केला होता. त्यामुळे ठाकरे गटात संभाव्य राजकीय घडामोडींविषयी चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा झाली होती. तसेच खासदार संजय जाधव यांच्या कुटुंबीयांची विचारपूसही शिंदे यांनी केल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली ही बैठक पक्ष संघटना आणि खासदारांमधील समन्वय दृढ करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. रविवारी होणाऱ्या या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती, खासदारांमधील समन्वय आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीतून कोणते संदेश बाहेर येतात, याकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात : मंत्री प्रतापराव जाधव शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडणारे ‘ऑपरेशन टायगर’ आता पूर्णपणे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल, असा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या या विधानामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील सुनेगावमध्ये एका औषध निर्माण कंपनीच्या उद्घाटनाप्रसंगी आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला.

COMMENTS