Homeताज्या बातम्या

दिव्यांगांचे सक्षमीकरण ही सामूहिक जबाबदारी : खा.निलेश लंके

श्रीगोंदा : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून, त्यांचे सक्षमीकरण हे केवळ शासनाचे नव्ह

नागपुरात भाडेकरूने घरमालकावर केला तलवारीने हल्ला; पाहुणी म्हणून आलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरियानंतर सोमण राणाची सुवर्ण झेप; राष्ट्रकुल स्पर्धेत आठव्या सुवर्णपदकासह भारताची दमदार कामगिरी
रॅलीऐवजी आज जिल्हाधिकार्‍यांमार्फत शिक्षणासंदर्भातील निवेदन; बीडमध्ये निर्धार सभेचे आयोजन

श्रीगोंदा : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून, त्यांचे सक्षमीकरण हे केवळ शासनाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचेही सामूहिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), भारत सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सहायक साधने व उपकरणे मूल्यांकन शिबिराचा शुभारंभ शनिवारी (दि. १) खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना लंके म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि ते स्वाभिमानाने जीवन जगू शकावेत, यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

या मूल्यांकन शिबिरात लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम हात-पाय, व्हिलचेअर, ट्रायसायकल, श्रवणयंत्र, वॉकर, काठी, कुबड्या तसेच इतर विविध सहायक साधनांसाठी नोंदणी व मूल्यांकन करण्यात आले. पुढील टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना ही साधने विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, गटविकास अधिकारी राणी फराटे, बाबासाहेब भोस, प्रा. संजय लाकूडझोडे, हरिदास शिर्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

शिबिरात लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

COMMENTS