Homeताज्या बातम्या

नागपूरमध्ये तरी पोह्यावरून किरकोळ वादात तरुणाची हत्या; नवी मुंबईत सासू-पत्नीचा खून

नागपूर : राज्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हत्येच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात तरी पोह्यांच्या (खायच

सत्यपाल महाराज प्रबोधनाच्या वाटवेळावरील अखंड दीपस्तंभ; धोबी समाजाच्या वतीने महाराजांचा वाढदिवस साजरा
भोंदू बाबा अशोक खरातला तुरुंगातही मिळणार भूसंपादनाचे तीन कोटी; अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा
३ कोटींच्या ७०२ किलो गांजाच्या साठ्यासह दोघांना अटक; एनसीबीची गोंदियात मोठी कारवाई
चार महिने भावासोबत राहिली, तीन दिवसांपूर्वीच सासरी परतली, पतीकडून  विवाहितेची निर्घृण हत्या

नागपूर : राज्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हत्येच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात तरी पोह्यांच्या (खायचा पदार्थ) कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले, तर नवी मुंबईत कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूरच्या कळमना परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेत योगेश शाहू या तरुणाचा जीव गेला. मिळालेल्या माहितीनुसार, तरी पोह्याची उसळ अंगावर उडाल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, काही जणांनी योगेशचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या योगेशचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांसह काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलीस त्याचा तपासात उपयोग करत आहेत.

COMMENTS