Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री बालाजी नगर नामफलकाचे अनावरण उत्साहात संपन्न

माहूर : शहरातील माहूर-पुसद मार्गावरील वार्ड क्रमांक 13 मधील लोकवस्ती परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आपल्या भागाला श्री बालाजी नगर असे नाव देण्याच

आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस
पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती!दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता 20 लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश-डॉ.गणेश ढवळे

माहूर : शहरातील माहूर-पुसद मार्गावरील वार्ड क्रमांक 13 मधील लोकवस्ती परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आपल्या भागाला श्री बालाजी नगर असे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या नामकरणाचा अधिकृत प्रारंभ म्हणून दि. 22 एप्रिल रोजी नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले.
या नामफलकाचे अनावरण माहूर नगरीतील युवा नेतृत्व, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमावेळी परिसरात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी जेष्ठ नागरिक वसंतराव चव्हाण, भाजप नेते सुमितभाऊ राठोड, हिरासिंग चव्हाण, शंकर जयस्वाल, सियाराम जयस्वाल, सुरेश गिर्‍हे, रील स्टार प्रवीण जाधव, प्रदीप शेकूरवार, गोपाल चव्हाण, कुंदन तीवडकर, राहुल पाटील, संतोष जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री बालाजी नगर या नावामुळे परिसराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल व नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच या नामकरणामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS