Homeताज्या बातम्या

बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा; खा.बजरंग सोनवणे पोटतिडकीने बोललेपालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; 17 सप्टेंबरपूर्वी रेल्वे सुरू करण्याचा दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन

बीड : स्व.अजित पवार यांनी बीड जिल्ह्याला रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत दिलेला शब्द 17 सप्टेंबरपूर्वी पाळलाच पाहिजे. त्यासाठी बीड-परळी रेल्वे प्रकल्प

बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणेसंपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक
रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका
खोट्या गुन्ह्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा; खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


बीड : स्व.अजित पवार यांनी बीड जिल्ह्याला रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत दिलेला शब्द 17 सप्टेंबरपूर्वी पाळलाच पाहिजे. त्यासाठी बीड-परळी रेल्वे प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशी पोटतिडकीची मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली. तसेच बीडकरांच्या सोयीसाठी ’बीड ते हडपसर’ आणि ’बीड ते मुंबई’ या दोन नव्या रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणीही त्यांनी रेल्वेच्या बैठकीत लावून धरली.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.30 जुलै) सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बीड-परळी रेल्वे मार्गाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे प्रकल्पातील विलंबाबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, बीड जिल्ह्यासाठी 17 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस असून या तारखेपूर्वी रेल्वे धावलीच पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व प्रशासकीय, तांत्रिक आणि जमिनीशी संबंधित बाबींचा तात्काळ निपटारा करण्यात यावा. प्रशासनाने कोणताही विलंब न करता ही अंतिम मुदत गृहीत धरूनच कामाचा वेग वाढवावा. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांची दीर्घकाळापासूनची गरज लक्षात घेता, बीडवरून थेट मुंबई आणि पुण्यासाठी (हडपसर) रेल्वे सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही रेल्वे सुरू झाल्यास जिल्ह्याचा राजधानी आणि उपराजधानीशी थेट संपर्क प्रस्थापित होईल. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मध्य रेल्वे प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून ही प्रक्रिया युद्धपातळीवर मार्गी लावावी, अशी मागणीही खा. सोनवणे यांनी बैठकीत लावून धरली. या बैठकीत पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही संबंधित अधिकार्‍यांना रेल्वेच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले असून, सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील, असे आश्वासन दिले.

COMMENTS