https://youtu.be/fv5pyJfRs2s मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनातील
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनातील दगडांवरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक करण्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरे म्हणाले, “मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट बघायचेत. हा कसला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री?”राज ठाकरे यांनी जेन झी पिढीचा उल्लेख करत, इंग्रजी बोलणारीच मुलं जेन झी नसून ग्रामीण भागातील तरुणांचाही विचार केला पाहिजे, असेही स्पष्ट केले. शिक्षणमंत्र्यांनी जग कुठे चाललंय याचा विचार करायला हवा, अशी टीकाही त्यांनी केली.याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह भाषेवर व्यक्त केलेल्या नाराजीशी सहमत असल्याचे सांगत, “हीच शिकवण आपल्या पक्षातील ट्रोलर्सनाही द्या,” असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

COMMENTS