Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रि-बार्गेनिंगद्वारे पहिला ऐतिहासिक निकाल

नांदेड : नांदेड जिल्हा न्यायालयात प्रथमच प्रि-बार्गेनिंग (पूर्व खटला करार) पद्धतीचा वापर करून एका प्रकरणाचा निकाल देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्या

खरातला रूपाली चाकणकरांचे 177 कॉल; अंजली दमानिया यांचे पुन्हा गंभीर आरोप
“पाया पडतो, मारू नका” अशी विनवणी करणाऱ्या आदिवासी तरुणाला सिंगरौलीत अमानुष मारहाण
सत्तेच्या माजात हैवानपणा! मंत्र्यांच्या माजी ओएसडीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; चिमुकल्यालाही बेदम मारहाण
जिल्हा न्यायालयाच्या नविन इमारतीसाठी दिडशे कोटी

नांदेड : नांदेड जिल्हा न्यायालयात प्रथमच प्रि-बार्गेनिंग (पूर्व खटला करार) पद्धतीचा वापर करून एका प्रकरणाचा निकाल देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तानाजी सोलनकर यांच्या न्यायासनासमोर ही प्रक्रिया पार पडली असून न्यायप्रक्रियेला गती देणारा हा निर्णय मानला जात आहे.
2019 मध्ये बारड येथे वीज वितरण कंपनीचे लाईनमन गोविंद कोटापल्ले यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी आरोपी अनिल आठवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आरोपीने प्रि-बार्गेनिंगचा अर्ज सादर करून खटला निकाली काढण्याची विनंती केली. न्यायालयाने फिर्यादीचे मत जाणून घेतले असता, आरोपी 211 दिवस कारागृहात राहिल्याने तीच शिक्षा मान्य करावी व दंड आकारू नये, अशी भूमिका फिर्यादीने मांडली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीने भोगलेला कारावासच अंतिम शिक्षा म्हणून ग्राह्य धरला. या प्रक्रियेत सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी प्रभावी भूमिका बजावली. न्यायालयीन प्रक्रियेवरील ताण कमी करण्यासाठी प्रि-बार्गेनिंग पद्धत उपयुक्त ठरत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

COMMENTS