पाथर्डी : तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे सुमारे तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील वाद गावातच मिटवावेत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, पुरुषोत्तम आठरे, रवी वायकर, रामनाथ कोलते, संदीप वायकर, सचिन वायकर, आर. बी. शेख, चंद्रशेखर वायकर, हरी वायकर, सुरेश कुटे, उद्धव भडके, सचिन कोलते, चंद्रशेखर कोलते, भाऊसाहेब वायकर, सोमनाथ रणसिंग, जयराम लबडे, सावता तुपे, अनिल तिजोरे, पोपट वाळके, सागर तापते, मनीषा वायकर, सुनिता कोलते, शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की, या गावाने आप्पासाहेब राजळे व स्व. राजीव राजळे यांच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. मात्र मागील निवडणुकीत काही बुथवर कमी मते मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत किंवा इतर निवडणुकांमध्ये काहीही करा, पण विधानसभेसाठी कमळालाच मतदान करा, असे त्यांनी स्पष्ट केले. गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी सभामंडपासाठी दिलेला निधी अपुरा पडल्यास तो वाढविण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम दर्जेदार व्हावे, तसेच फर्निचरसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दिलेल्या निधीतून कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी स्थानिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील अंतर्गत संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाने निर्णय घेतला असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत प्रति किलोमीटर सुमारे १५ लाख रुपयांचा निधी रस्ते मजबुतीकरणासाठी दिला जात असून, यासाठी शासनाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी वायकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. बी. शेख यांनी मानले.

पाथर्डी : तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे सुमारे तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील वाद गावातच मिटवावेत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, पुरुषोत्तम आठरे, रवी वायकर, रामनाथ कोलते, संदीप वायकर, सचिन वायकर, आर. बी. शेख, चंद्रशेखर वायकर, हरी वायकर, सुरेश कुटे, उद्धव भडके, सचिन कोलते, चंद्रशेखर कोलते, भाऊसाहेब वायकर, सोमनाथ रणसिंग, जयराम लबडे, सावता तुपे, अनिल तिजोरे, पोपट वाळके, सागर तापते, मनीषा वायकर, सुनिता कोलते, शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की, या गावाने आप्पासाहेब राजळे व स्व. राजीव राजळे यांच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. मात्र मागील निवडणुकीत काही बुथवर कमी मते मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत किंवा इतर निवडणुकांमध्ये काहीही करा, पण विधानसभेसाठी कमळालाच मतदान करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी सभामंडपासाठी दिलेला निधी अपुरा पडल्यास तो वाढविण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम दर्जेदार व्हावे, तसेच फर्निचरसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दिलेल्या निधीतून कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी स्थानिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण भागातील अंतर्गत संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाने निर्णय घेतला असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत प्रति किलोमीटर सुमारे १५ लाख रुपयांचा निधी रस्ते मजबुतीकरणासाठी दिला जात असून, यासाठी शासनाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी वायकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. बी. शेख यांनी मानले.

COMMENTS