Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्हे तपासासाठी एआय प्रकल्पाला आर्थिक बळ; ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; 2 कोटींचा निधी मंजूर

नागपूर : अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आधार घेणारा राज्यातील पहिला प्रायोगिक प्रक

किनवट पोलिसांची मोठी कारवाई; 9 लाख 72 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त
बलात्कारी मांत्रिक अशोक खरात याचे ५८ व्हिडिओ जप्त
राहुरीत अवैध सावकारांवर धाड; सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाची छापेमारी; कागदपत्रे जप्त

नागपूर : अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आधार घेणारा राज्यातील पहिला प्रायोगिक प्रकल्प नागपूर ग्रामीण पोलिस दलाकडून राबविला जात आहे. यासाठी ‘महाक्राईमओएस’ या एआय प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. या ऑपरेटींग सिस्टीमच्या खरेदीसह इतर बाबींसाठी गृह विभागाने सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गुन्हे तपासासाठी या एआय प्लॅटफॉर्मचा वापर येत्या काळात संपूर्ण राज्यात करण्याचे प्रस्तावित आहे.
हा एआय प्लॅटफॉर्म आता ‘महाक्राईमओएस’ म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि अध्यक्ष सत्या नडेला यांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात करण्यात आली. अमली पदार्थांशी संबंधित गंभीर गुन्हे, आर्थिक फसवणुकीची प्रकरणे, सायबर क्राईम आणि लैंगिक गुन्ह्यांच्या तपासाचे स्वरुप अतिशय गुंतागुंतीचे असते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तपास अधिकार्‍याला अधिक मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अशा गुन्ह्यांचा तपास करता येईल का, असा विचार गृह विभागाकडून सुरु होता. त्यातूनच नागपूर ग्रामीणमधील एआय आधारित तपासाचा हा प्रायोगिक प्रकल्प पुढे आला. या प्रकल्पात एआय प्लॅटफॉर्म म्हणून मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या ‘क्राईमओएस’ हे मुलभूत एआय ऑपरेटींग सिस्टीमचा आधार घेण्यात आला. राज्य शासनाची संस्था असलेल्या ‘मार्व्हल’ने तिचा महाराष्ट्रात व मराठी भाषेत वापर करण्याच्या दृष्टीने त्यात आणखी सुधारणा घडवून आणल्या. महाराष्ट्र पोलिसांची तपासाची ‘एसओपी’ म्हणजेच मानक कार्यपद्धती तसेच तपासाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निवाडे विचारात घेऊन या बाबी प्लॅटफॉर्ममध्ये अनुकूल करून समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

133 पोलिस अधिकार्‍यांना प्रशिक्षण
या प्रकल्पासाठी नागपूर ग्रामीण पोलिस दलात एकूण 133 पोलिस अधिकार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच या एआय प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन आतापर्यंत तब्बल 287 प्रकरणांचा तपास करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर व दिडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांमध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलाला यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. आता गृह विभागाने या प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्यातून प्रत्यक्षात ‘महाक्राईमओएस’ एआय ऑपरेटींग सिस्टीमची खरेदी तसेच ‘लिगल डेटा बेस’चा वापर करुन हा प्लॅटफॉर्म आणखी सक्षम करण्याचे नियोजन आहे.

COMMENTS