श्रीरामपूर : भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर जिल्हाभरात खळबळ उडाली असून, आपल्या आसपास कोणी बुवा-बाबा लोकांच्या श्रद्धेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेत आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक फसवणूक करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी अशोक खरात या भोंदू बाबाविरुद्ध धडक कारवाई करून त्याला अटक केली. या कारवाईस विरोध असतानाही धाडसाने कारवाई केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया पत्रकार-संपादक संघ तसेच मानवाधिकार संघटनांच्या वतीने वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांनी सांगितले की, शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला असला तरी तो प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविला जात नसल्याने गावागावांत बुवाबाजी वाढत आहे. खरातसारखे भोंदू बाबा सर्वत्र निर्माण झाले असून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या वेळी प्रा. गोरख बारहाते, पत्रकार असलम बिनसाद, वंदना गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास इनायत आतार, संतोष वाकचौरे, अमोल साबणे, विशाल शिरसाठ, अमोल शिरसाठ, रज्जाक पठाण, भार्गवी गायकवाड, बाबासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर : भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर जिल्हाभरात खळबळ उडाली असून, आपल्या आसपास कोणी बुवा-बाबा लोकांच्या श्रद्धेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेत आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक फसवणूक करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले.
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी अशोक खरात या भोंदू बाबाविरुद्ध धडक कारवाई करून त्याला अटक केली. या कारवाईस विरोध असतानाही धाडसाने कारवाई केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया पत्रकार-संपादक संघ तसेच मानवाधिकार संघटनांच्या वतीने वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांनी सांगितले की, शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला असला तरी तो प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविला जात नसल्याने गावागावांत बुवाबाजी वाढत आहे. खरातसारखे भोंदू बाबा सर्वत्र निर्माण झाले असून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
या वेळी प्रा. गोरख बारहाते, पत्रकार असलम बिनसाद, वंदना गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास इनायत आतार, संतोष वाकचौरे, अमोल साबणे, विशाल शिरसाठ, अमोल शिरसाठ, रज्जाक पठाण, भार्गवी गायकवाड, बाबासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.

COMMENTS