Homeताज्या बातम्याविदेश

समलिंगी जोडप्याने दिला चक्क बाळाला जन्म

ब्रिटन प्रतिनिधी - ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एका लेस्बियन जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे. दोघांनी मिळून बाळाची गर्भधारणा केली आणि नंतर मुलाला जन

Yeola : छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले : ना. जयंत पाटील (Video)
ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड
इस्लामपूर येथील 400 कुटुंबियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी

ब्रिटन प्रतिनिधी – ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एका लेस्बियन जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे. दोघांनी मिळून बाळाची गर्भधारणा केली आणि नंतर मुलाला जन्म दिला.अस्तेफोनिया वय वर्षे 30, आणि अझहरा, वयवर्षे 27, यांनी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या लहान मुलाचे डेरेक एलॉयचे स्वागत केले.  या साठी या लेस्बियन जोडप्यानं इन्व्हॉसेल हे नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. मार्च महिन्यात बाळाला जन्म देण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली . एस्टेफानियाच्या आत अंड्याचे फलन करण्यात आले आणि त्यानंतर अझहराने ते 9 महिने तिच्या गर्भाशयात ठेवले. मार्चमध्येच ही प्रक्रिया सुरू झाली होती. एस्टेफानिया आणि अझहरा यांनी इनव्होसेल नावाने ओळखले जाणारे नाविन्यपूर्ण प्रजनन उपचार घेतले. या उपचारात, अंडी आणि शुक्राणू प्रथम योनीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या कॅप्सूलमध्ये टाकले जातात. ही कॅप्सूल पाच दिवस बंद होती. यानंतर कॅप्सूल बाहेर काढण्यात आली.

कॅप्सूल काढल्यानंतर भ्रूणांची तपासणी करून चांगले भ्रूण अझहराच्या गर्भाशयात हलवण्यात आले. यानंतर अझ्राने त्याला 9 महिने गर्भात ठेवले आणि 30 ऑक्टोबर रोजी तिने सी सेक्शनद्वारे डेरेकला जन्म दिला. या प्रक्रियेसाठी जोडप्याला US$5,498 भारतीय रुपये सुमारे 4 लाख 57 हजार खर्च करावे लागले. डेरेक हे इनव्होसेल प्रक्रियेसह जन्मलेले पहिले युरोपियन बाळ आहे.

COMMENTS