Homeताज्या बातम्या

3 महिन्यांपासून निराधार योजनांचे अनुदान रखडले; शिवसेना (ठाकरे गट)चा तहसील कार्यालयावर घेराव

देगलूर तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन तसेच अपंग कल्याण योजनांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून

तरोडा बुद्रुकमध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकत केला तीव्र निषेध
17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य एल्गार मोर्चागेवराई तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अलीम सय्यद
विविध मागण्यासाठी चंदगड तहसीलवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा



देगलूर तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन तसेच अपंग कल्याण योजनांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळाले नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 22 जून) तहसील कार्यालयावर घेराव घालून तीव्र निदर्शने करण्यात आली.
शासनाचे पोर्टल बंद असल्यामुळे अनुदान वितरण रखडल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे तालुक्यातील हजारो वृद्ध, निराधार, अपंग, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकार्‍यांनी नायब तहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालत जाब विचारला. देगलूर तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे 6 हजार 786, इंदिरा गांधी योजनेचे 4 हजार 644 आणि संजय गांधी निराधार योजनेचे 4 हजार 808 असे एकूण 16 हजार 238 लाभार्थी आहेत. तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच येत्या काही दिवसांत रखडलेले अनुदान तातडीने वितरित न झाल्यास तहसील कार्यालयाला कुलूप ठोकून धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा संजय गांधी, इंदिरा गांधी आणि श्रावणबाळ योजनांचे माजी अध्यक्ष महेश पाटील, देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके, शहरप्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहरप्रमुख विनोद सोनकांबळे, विभागप्रमुख राजेंद्र उल्लेवार, गंगाधर पाटील, उपविभाग प्रमुख गंगाधर वंकलवार, गटप्रमुख सुभाष खुनेवाड, माजी सरपंच शिंदे, संग्राम माधवराव गाडले यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा करावे, अशी मागणी केली.

COMMENTS