पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या प्रेरणेतून कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटी व भवितव्य नगर परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन म

पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या प्रेरणेतून कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटी व भवितव्य नगर परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दि. 21 जून रोजी महालिंगेश्वर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटांतील असंख्य योगसाधकांनी सहभाग घेत निरोगी जीवनाचा संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थना आणि योगाभ्यासाने झाली. योगशिक्षक अवधूतगिरी महाराज, सदाशिव बुटले पाटील, किरण मुतेपवार, भरत मोरे, शिवानंद स्वामी, डॉ. प्रा. दिलीप माने यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य अधिक सक्षम होत असल्याचा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवेश्वर कंजे यांच्यासह प्रदीप संगनवार, अंगत शिंदे, राजेश्वर अबुलकर, रतन कल्याणकर, नागोराव सूर्यवंशी, नारायण बालाजी सूर्यवंशी, प्रदीप पारसेवार, उत्तमराव कल्याणकर, हरिभाऊ धोपरे, विनोदकुमार पाटील, सोहम पावडे, सुधाकर लोमटे, गोलूगिरी, उज्वला संगणवार, विद्या स्वामी, मनीषा कुलकर्णी, मिंटू भालोडिया, युवराजनी चव्हाण, कल्पनाताई मोरे, लताताई मद्रेवार, उषाताई पवार, सुरेखाताई शिंदे, रीनाताई भुरे, प्रणिताताई पवार, उज्वलाताई तरटे, प्रा. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, नागरबाई माळगे, गिरडे गुरुजी, सुरेश कुलकर्णी, नंदकिशोर साखरकर, रेणुकादास धानोरकर, कणकापुरे काका यांच्यासह अनेक योगप्रेमी उपस्थित होते. करो योग, रहो निरोग हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून संतुलित, सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे, याची प्रचिती या कार्यक्रमातून उपस्थितांना आली. सामूहिक योगाभ्यासातून आरोग्य, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरला.

COMMENTS