Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत जनाबाई यांचे उदात्त चरित्र म्हणजे भक्तांसाठी आदर्शसाध्वी सृष्टीलता : सेवा समितीतर्फे रामकथेचे आयोजन

बुलडाणा : ज्या भूमीवर संतांचे चरण पडतात ती भूमी अध्यात्मिक साधनेसाठी पवित्र असते संत गजानन महाराज संत नामदेव महाराज, संत चोखामेळा इत्यादी अनेक सं

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू
आई-वडिलांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य-शांतीब्रह्म नवनाथ बाबा; ब्रम्हनाथ वस्ती येथे हरिकीर्तन उत्साहात संपन्न
 बेलापूरमध्ये संतसंग उद्घाटन समारंभ उत्साहात
The noble character of Saint Janabai is a role model for devotees - Sadhvi  Shrishtilata, Sadbhavana Seva Samiti organizes Ram Katha; Spontaneous  response from citizens


बुलडाणा : ज्या भूमीवर संतांचे चरण पडतात ती भूमी अध्यात्मिक साधनेसाठी पवित्र असते संत गजानन महाराज संत नामदेव महाराज, संत चोखामेळा इत्यादी अनेक संताचे दृष्टांत देऊन संत जनाबाईचे उदात्त चरित्र भक्तांसाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन साध्वी सृष्टीलता यांनी केले.
अयोध्या धाम लहाने लेआऊट मैदान येथे राम कथा सुरू आहे. मुख्य यजमान दीपक वर्मा, किरण वर्मा ,दैनिक यजमान ,सागर जयस्वाल, दीपिका जयस्वाल ,यांनी पंडित सच्चिदानंद महाराजांच्या हस्ते संकल्प सोडून यजमानांनी पूजा माल्यार्पण करून साध्वी सृष्टीलता यांचे स्वागत केले व आरती केली. वर्मा समाज, गुजराती समाज ,पंजाबी समाज ,सिंधी समाज, यांच्याकडे संपूर्ण दिवसाचे व्यवस्थापन होते. राजश्री गणात्रा, विमल पटेल, किरण वर्मा, दीपा वर्मा, डोली खुराणा, अंजली पंजाबी, शारदा कमानी, दर्शना रघानी ,गीता रघानी या महिलांचा समावेश होता. नीलेश बाहेती, अमोल जालिंदर बुधवंत, रतनसेट नैनानी, मुकेश नयनानी, दत्तात्रय जाधव, संतोष सांखला, प्रीतेश बेदमुथा, सुरेश चौधरी ,लाला माधवानी यांनी आरती मध्ये सहभाग घेतला. आनंद ज्वेलर्स द्वारा ड्रायफूटचा प्रसाद यावेळी भक्तांना वितरित करण्यात आला. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाले. अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले. त्याची स्मृती म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यावेळी अर्पण करण्यात आली.
सर्व नामांकित व जास्त विक्री असलेल्या सर्व वर्तमानपत्राचे प्रतिनिधी साध्वीसृष्टी यांनी कौतुक केले. इतकी व्यापक प्रसिद्धी बुलडाणा मध्ये वर्तमानपत्रात मिळाल्याबद्दल धन्यवाद दिले. सर्व सन्माननीय पत्रकारांचा साध्वी सृष्टीलताजी यांनी शाल देऊन सन्मान केला. आनंद ज्वेलर्सचे रतनलालजी वर्मा यांनी सर्व पत्रकारांना प्रसाद दिला. याप्रसंगी लक्ष्मीकांत बगाडे, रणजीतसिंह राजपूत, अरुण जैन, अनिल मस्के,राजेंद्र काळे, नितीन शिरसाठ,राजेश डिडोळकर, सुधाकर मानवतकर, राजेश देशमाने, परमेश्‍वर शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. रामकथा कार्यक्रमात विविध समाजाचा समावेश आजच्या दिवसाचे व्यवस्थापन गुरव समाज,लेवा पाटील, सखी मंच मराठा समाज,चंदन ग्रुप समाज महिला मंडळाकडे आहे.वासुदेव कोठारी, अतुल लाहोटी, कुमार दलाल, कमलेश चांडक, नीलम खोत,रामदास शिंदे,अजय लाहोटी व सर्व यजमान रामायण पाठाचे यांनी व्यासपीठावर आरती केली.

COMMENTS