Homeताज्या बातम्या

पत्रकार सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन

चकलांबा गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील दैनिक झुंजार नेताचे पत्रकार सुभाष शिंदे यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजीनगर येथील धूत हॉस्पिटलमध्ये उप

बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण
बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
देवळाली प्रवरात उबाठा शिवसेनेची संघटनबांधणी बैठक

चकलांबा गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील दैनिक झुंजार नेताचे पत्रकार सुभाष शिंदे यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजीनगर येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून सहकार्‍यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील तलवाडा सारख्या ठिकाणी पत्रकारिता करताना सुभाष शिंदे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांना वाचा फोडली. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. काही दिवसांपासून त्यांना छातीत त्रास होत असल्याने उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 1 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तलवाडा व परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून पत्रकार बांधवांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

COMMENTS