Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. शासनाच्या

ई-केवायसी न केल्याने ८० लाख लाडकी बहिणी यादीतून बाद; लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट
आ. बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नांदेड शहर-ग्रामीणमधील 29 हजार शेतकर्‍यांसाठी 24. 50 कोटींचा पिक विमा मंजूर
उधमपूरमध्ये बस अपघातात 21 जणांचा मृत्यू
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ई-केवायसीनंतर 54 लाख महिला  यादीतून बाहेर; ₹1500 चा लाभ कायमचा बंद | ladki bahin yojana around 54 lakh  women benefit permanently ...

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. शासनाच्या नव्या आणि कडक निर्णयामुळे सुमारे 54 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे या महिलांना आता मिळणारी आर्थिक मदत बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात होते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत होती आणि लाखो महिलांना याचा थेट लाभ मिळाला होता. मात्र, कालांतराने या योजनेत काही अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी शासकीय सेवेत असलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे सुरुवातीपासून निश्‍चित करण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

COMMENTS