नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आय-पॅक संस्थेचे संचालक विनेश चंडेल यांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्ट यांनी मोठा दिलासा द

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आय-पॅक संस्थेचे संचालक विनेश चंडेल यांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्ट यांनी मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर करत सुटकेचे आदेश दिले.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित बन्सल यांच्यासमोर झाली. विशेष म्हणजे, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जामीन अर्जाला ठोस विरोध केला नाही. त्यामुळे न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. सुनावणीदरम्यान चंडेल यांच्या वकिलांनी मांडणी करताना सांगितले की, ईडीला जामीन अर्जावर आक्षेप नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 45 अंतर्गत लागू होणार्या कडक अटी या प्रकरणात लागू होत नाहीत, असा युक्तिवाद करण्यात आला. या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने चंडेल यांना जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. चंडेल यांना अटक केल्यानंतर 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले होते. ईडीच्या तपासानुसार, ‘पीएसी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत त्यांची सुमारे 33 टक्के हिस्सेदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुरुवात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरपासून झाली होती.

COMMENTS