कर्जत : तालुक्यातील सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची चोरीछुपे वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कर्जत पोलिसांनी धाडसी कारवाई करत ट्रॅक्टरसह एकूण ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चापडगाव ते कर्जत रोडवरील भंडारी वस्तीजवळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली ट्रॉली अडविण्यात आली. ट्रॉलीमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता तो संकेत सुनील शिंदे (रा. चापडगाव) असल्याचे निष्पन्न झाले. पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला असून, त्यामध्ये एक ब्रास वाळू (किंमत ४ हजार रुपये) व हिरव्या रंगाचा जॉन डीअर कंपनीचा ५० एचपी क्षमतेचा ५२१० मॉडेल ट्रॅक्टर (किंमत ६ लाख रुपये) असा एकूण ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात संकेत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल सानप व पोलीस कॉन्स्टेबल सचिन थोरात यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

कर्जत : तालुक्यातील सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची चोरीछुपे वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कर्जत पोलिसांनी धाडसी कारवाई करत ट्रॅक्टरसह एकूण ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चापडगाव ते कर्जत रोडवरील भंडारी वस्तीजवळ छापा टाकला.
या कारवाईदरम्यान हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली ट्रॉली अडविण्यात आली. ट्रॉलीमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता तो संकेत सुनील शिंदे (रा. चापडगाव) असल्याचे निष्पन्न झाले.
पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला असून, त्यामध्ये एक ब्रास वाळू (किंमत ४ हजार रुपये) व हिरव्या रंगाचा जॉन डीअर कंपनीचा ५० एचपी क्षमतेचा ५२१० मॉडेल ट्रॅक्टर (किंमत ६ लाख रुपये) असा एकूण ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात संकेत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल सानप व पोलीस कॉन्स्टेबल सचिन थोरात यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS