Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पोलिसाची चौकीत डोक्यात गोळी घालून आत्महत्या

पुणे ः पुणे शहरातील लोहियानगर पोलिस चौकीत रात्रपाळी करणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने पोलिस चौकीतच डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची धक्कादाय

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या
खडकवासला धरणात तरूणाची आत्महत्या
भावाकडून 9 महिने बहिणीवर अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन केली आत्महत्या.

पुणे ः पुणे शहरातील लोहियानगर पोलिस चौकीत रात्रपाळी करणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने पोलिस चौकीतच डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक कारणांमुळे या कर्मचार्‍याने हे पाऊल उचलल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.
या संबंधीच्या वृत्तानुसार, भारत दत्ता आस्मर (35) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. ते पुणे शहरातील खडक पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या लोहियानगर पोलिस चौकी भागात रात्रपाळीवर तैनात होते. ते गुरुवारी रात्री रात्रपाळी करून विश्रांती घेण्यासाठी चौकीतीलच विश्राम कक्षात गेले. तिथे त्यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. त्यांनी घरगुती कारणातून आत्महत्या केल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाली आहे. याबाबत खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी माहिती दिली की, खडक पोलिस स्टेशनच्या अखत्यारित येणार्‍या लोहियानगर पोलीस चौकीत पोलिस अंमलदार भारत आस्मर हे नेमणुकीस होते. गुरुवारी रात्री सीआर मोबाइल व्हॅनवर त्यांची एक चालक व एक कर्मचारी यांच्यासह गस्तीसाठी नियुक्ती केली होती. रात्रपाळी करुन पोलिस चौकीत परतल्यानंतर भारत आस्मर हे त्यांच्या सहकार्‍यांना आराम करण्यासाठी चौकीच्या पहिल्या मजल्यावरील विश्रांतीगृहात जातो असे सांगून त्यांच्या नावावर असलेली कार्बाइन बंदुक घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी अचानक स्वतःच्या डोक्यात गोळी मारुन घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने विश्रांतीगृहात धाव घेऊन खोलीत पाहिले असता, स्वत:च्या डोक्यात गोळी मारुन घेत भारत आस्मर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला, असे ते म्हणाले. दरम्यान, भारत आस्मर यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले? त्याचा तपास केला जात आहे.

COMMENTS