Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्‍यांनी आर्थिक प्रगती करावी

महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे आवाहन

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासाफाटा येथे शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या व्यंकटेश अँग्रो इंडस्ट्रीज या दालनाचे उदघाटन श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख मह

जामखेड विकास आराखडा नेमका कोणासाठी ?
अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करा…
वडगाव पान उपबाजार येथे कांदा लिलाव सुरू

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासाफाटा येथे शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या व्यंकटेश अँग्रो इंडस्ट्रीज या दालनाचे उदघाटन श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. शेतीमध्ये नवंनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकर्‍यांनी आर्थिक उन्नती साधावी ती काळाची गरज बनली असून उत्कर्षाकडे वाटचाल करण्यासाठी शेती उद्योगासह व्यवसाय हेच मोठे माध्यम असल्याचे प्रतिपादन श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी केले.
     नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत करता यावे यासाठी नेवासाफाटा येथील नगर-संभाजीनगर रोडवर शेतकर्‍यांच्या सेवेसाठी दालन सुरू केले या दालनाचे उदघाटन महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते व सौ.सुनीताताई गडाख,पुणे येथील समाज प्रबोधनकार माऊली कन्या हभप दीपालीताई पुणेकर,ह.भ.प. लक्ष्मीनारायण जोंधळे,मुकींदपूरचे सरपंच सतीशदादा निपुंगे, सरस्वती ऍग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक संदीप आव्हाड,संतोष काळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी महंत सुनीलगिरीजी महाराज अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रम संयोजक दत्तात्रय जाधव, दीपक जाधव, रामेश्‍वर डीके, सचिन जाधव यांनी स्वागत केले. यावेळी महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे संतपूजन तर उपस्थित मान्यवरांचा सन्मान दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांसाठी उपलब्ध नवनवीन अवजारे व यंत्रांची पहाणी करून त्यांचे पूजन गुरुवर्य सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना महंत सुनीलगिरीजी महाराज म्हणाले की नेवासाफाटा परिसरात दिवसेंदिवस झपाट्याने नवनवीन उद्योगात  वाढ होत आहे. हे या परिसरातील दृष्टीने हिताची बाब आहे. व्यंकटेश ऍग्रोच्या रूपाने शेतकर्‍यांना दूध काढणी यंत्र यासह सुधारित अवजारे यंत्र योजनेद्वारे उपलब्ध होणार असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍यांनी जीवनात प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. या प्रसंगी गोधेगाव येथील नागरिक पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS