Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाडेगाव जवळ प्रवासादरम्यान महिलेची बसमध्ये प्रसुती: बसमधील महिलांनी पुढाकार घेत केली प्रसूती

लोणंद / वार्ताहर : कर्नाटक येथील देवदुर्ग येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे निघालेल्या महिलेची प्रवासादरम्यान प्रसुती झाली आहे. प्रसुतीनंतर ही महिला

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धकका; गुंतवणुकदार चिंतेत
माजी मंत्री पाटणकर यांच्यावर सोशल मीडियावर अवमान; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

लोणंद / वार्ताहर : कर्नाटक येथील देवदुर्ग येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे निघालेल्या महिलेची प्रवासादरम्यान प्रसुती झाली आहे. प्रसुतीनंतर ही महिला आणि तिच्या नवजात बाळाला निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून बाळंत महिला व नवजात बाळाची प्रकृती चांगली असल्याचे निरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशांनी दिलेली माहिती अशी की, ज्योती सोमनाथ चव्हाण ही 20 वर्षीय महिला पुणे येथील भोसरी येथे तिच्या पतीसह राहते. ती बाळंतपणासाठी कर्नाटकातील मानवी तालुक्यातील मुरामपुरतांडा येथे आपल्या माहेरी वडिलांकडे गेली होती. तेथील डॉक्टरांनी डिलिव्हरी सिझेरियन पध्दतीने करावी लागेल, असे सांगितले होते. त्यामुळे पैशाअभावी तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे आणण्याचा सल्ला पतीने तिच्या वडिलांना दिला होता. काल रात्री ही बस देवदुर्ग येथुन पुण्याकडे रवाना झाली. यामधुन ही महिला प्रवास करत होती. त्यावेळी तिला प्रसुतीच्या कळा झाल्या होत्या.
दि. 24 ऑक्टोंबर सकाळी 10 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या पुढे आल्यावर पाडेगावजवळ तिला जास्तीचा त्रास होवू लागल्याने बसमधील इतर महिलांनी पुढाकार घेऊन तिची प्रसुती केली. दरम्यान बसचालकाने 108 ला फोन करून अ‍ॅम्बुलन्स बोलावली. यानंतर या महिलेला निरा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. समिक्षा कांबळे यांनी महिलेवर उपचार केले. त्यांना ज्योती साळवे, योगिता टिळेकर यांनी मदत केली. यावेळी कर्नाटक परिवहन चालक व वाहक तसेच बसमधील प्रवाशांनी सहकार्य करून ही प्रसुती निर्धोकपणे पार पाडण्यास मदत केली. बसमधील सहप्रवासी लक्ष्मी पवार, नागेश्‍वरी पवार, रिरेमा राठोड यांनी ही प्रसुती यशस्वी पार पाडली.

COMMENTS