Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड विकास आराखडा नेमका कोणासाठी ?

नागरिकांची हरकत ; आराखडा विकासासाठी की विस्थापनासाठी ?

जामखेड ः प्रशासक काळात तयार केलेला जामखेड शहर विकास आराखडा प्रशासनाने नेमका कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहे. व

कोतुळमध्ये पोलिस बंदोबस्तात अखेर रस्ता खुला
निस्वार्थीपणे शहरातील समस्या सोडवणारे युवा नेतृत्व प्रशांत शेळके
जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू घडवण्यासाठी सहकार्य करू ः विवेक कोल्हे

जामखेड ः प्रशासक काळात तयार केलेला जामखेड शहर विकास आराखडा प्रशासनाने नेमका कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहे. व्यापार्‍यांना, राजकीय, सामाजिक लोकांना, जनतेला विश्‍वासात न घेता केलेल्या शहरविकास आराखड्याला शहरातील व्यापारी मुस्लिम पंच कमिटी व नागरिकांनी विरोध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबत शहरवासीयांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966चे कलम 26/11अन्वये तयार केलेल्या जामखेड शहर विकास आराखडयात फार मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. याबाबत तक्रारी दाखल करण्याच्या दि 16 फेब्रुवारी शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाने सविस्तर माहिती पोहोचविली नाही. त्यामुळे सदर आराखडयाबाबत हरकती नागरिकांना करता आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या या धोरणाविरोधात आणि विकासाचा आराखडा आमच्या जीवनाशी निगडीत असतांना आम्हालाच विचारात न घेतल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. नगरपरिषदला दिलेल्या निवेदनावर प्रा. मधुकर राळेभात, अझहरभाई काझी, मंजुर सय्यद, मुख्तार सय्यद, शरद शिंगवी, पितळे मामा, मोहन भंडारी, संतोष लोढा, नाझीम काझी, हाजी जावेद बारूद सय्यद, शिवाजी डोंगरे, आण्णा साठे, अ‍ॅड घूमरे, अँड बोलभट पीबी, अ‍ॅड जेएम सय्यद, अ‍ॅड घोडेस्वार बीएस, अ‍ॅड बीव्ही जायभाय, अँड एजी बारवकर, हज्जू सूभेदार, नय्युमभाई सुभेदार, अँड सपकाळ एचडी,अँड अमीर पठाण, अँड अमोल जगताप, बागवान आबेद, गणेश सरोदे विशाल अब्दुले,अशा शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

उशीरा सुचलेले शहाणपण – आराखड्याबाबत एक महिना उलटला असला तरी मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी कोणतीही जनजागृती केली नाही. नगरपरिषद व नगररचना विभागाने आराखडयाबाबत जनजागृती करण्यासाठी तहसील, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, शहरातील मोक्याच्या जागेवर मोठ्या बँनर लावणे आवश्यक होते. मात्र  मुख्याधिकार्‍यांनी शेवटच्या दिवशी 16 फेब्रुवारी पर्यंत नागरिकांनी हरकती नोंदणी करण्याची सूचना अशी पोस्ट सायंकाळी व्हॉटस अ‍ॅपच्या काही गृपवर टाकुन मोकळे झाले. इकडे जनता आता काय करायचे विचाराधीन आहे, अन् तिकडे मुख्याधिकार्‍यांनी 2-4 गृपवर जनजागृती करण्याचे हास्यास्पद काम केले. हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदवल्या आहे. मुख्याधिकार्‍यांनी विकास आराखडा जनतेपर्यंत पोहचला नाही याला मुख्याधिकारी व नगरपरिषद प्रशासन जवाबदार आहे असा सूर नागरिकांमधून उमटतांना दिसून येत आहे.

एवढी मोठी डोळेझाक कशासाठी ?: प्रा मधुकर राळेभात – शहराचा विकास झालाच पाहिजे, मात्र आजची स्थिती पहावून डीपी प्लॅन करायला हवा होता. कब्रस्तानची जागा तसेच अनेक ठिकाणच्या जागा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना विस्थापित करून रस्त्यावर आणण्याचे काम या डिपी प्लॅनने केले आहे. सध्या चालू असलेल्या नानी-नानी पार्क जवळचा दुसरा बगीचा डीपी प्लॅनमध्ये दाखवला आहे. बीडरोडवरील 30 मिटर रस्त्यामध्ये अनेक घरे तुटत आहेत, मग त्याच रोडवर 45 मीटर रस्ता शहरात कशासाठी ? एवढी मोठी डोळेझाक कोणाच्या सांगण्यावरून केली? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करून सुट्टीच्या तीन दिवसांतही नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी टेबल कर्मचारी उपलब्ध करून द्यावा असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.

आराखडा मराठी भाषेत का नाही? :अझहरभाई काझी – नगरपरिषदने जाहीर केलेला विकास आराखडा इंग्रजी भाषेत कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला. इथे शिकलेल्यांना नीट कळत नाही मग सामान्य माणसाला इंग्रजी भाषेतील तो अहवाल तो कसा समजणार. प्रशासनाला राज ठाकरे यांचे बोलणे कळाले नाही वाटते. नकाशे पण मराठीत करून द्यावे.  तक्रारींसाठी मुदत द्यावी. नगरपरिषद जामखेड व नगररचना विभाग यांनी नगरसेवक व लोकप्रतिनिधी व्यापारी याच्याशी चर्चा न करता मनमानीपणे स्वतःच्या आख्त्यारीत विकास आराखडा केला .तो शहरासाठी नूकसान देणारा आहे. असे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी यांनी सांगितले.

COMMENTS