Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडगाव पान उपबाजार येथे कांदा लिलाव सुरू

मंगळवार, गुरुवार, शनिवारी लिलाव होणार

संगमनेर ः माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अग्रमानांकित असलेल्या संग

चासनळी व परिसरातील भाविकांची नर्मदा परिक्रमा उत्साहात
LokNews24 l आत्महत्येपुर्वी दीपाली यांचे आणखी एक पत्र, महिलेवर गंभीर आरोप
योगदिन आणि बिपीनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

संगमनेर ः माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अग्रमानांकित असलेल्या संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांच्या सोयीसाठी वडगाव पान येथे सुरू केलेल्या भव्य व अद्यावत उपबाजार समितीत मोठ्या उत्साहात कांदा लिलाव सुरू झाला.
वडगाव पान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांदा लिलाव सुरू प्रसंगी सभापती शंकर पा. खेमनर, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे,सतीश खताळ, विजय सातपुते, सौ.रुक्मिणी साकुरे, सौ दिपाली वरपे, सुधाकर ताजने, अनिल घुगे ,अरुण वाघ, सखाराम शेरमाळे, संजय खरात, निलेश कडलग, निसार शेख, मनसुख भंडारी, सचिन करपे,सचिव सतीश गुंजाळ, कांदा व्यापारी भारत शेठ मुंगसे आदींसह विविध पदाधिकारी कांदा व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सभापती खेमनर म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण विकासाचा पाया घातल्याने संगमनेर तालुका हा कृषी व ग्रामीण विकासात राज्यात अग्रेसर ठरला आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील वाढता कामाचा आवाका यामुळे वडगाव पान वीस एकरच्या प्रशस्त जागेत अद्यावत पद्धतीने उपबाजार सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी कांदा, डाळिंब तसेच बैल बाजारही भरवण्यात येणार आहे.शेतकरी व व्यापार्‍यांसाठी सर्व सुविधा असलेल्या वडगाव पान येथील उपबाजारात मोकळा लूज कांदा लिलाव दर आठवड्याच्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुपारी तीन वा. होणार आहे. तर बाबा ओहोळ म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पान बाजार समिती ही भव्य दिव्य झाली असून शेतकरी व व्यापार्‍यांसाठी येथे चांगली सुविधा आहे. दळणवळणाची ही चांगली सोय असल्याने या सुरू झालेल्या कांदा लिलावाचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्केट कमिटीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी केले . तर उपसभापती गीताराम गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी विविध पदाधिकारी, वडगाव पान येथील ग्रामस्थ, तसेच व्यापारी, आडतदार व कांदा उत्पादक, शेतकरी, हमाल, मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मंगळवार गुरुवार व शनिवारी मोकळ्या कांद्याचा लिलाव – वडगाव पान उपबाजार समितीमध्ये मोकळ्या (लूज ) कांद्याचा लिलाव दर आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुपारी 3 वा. होणार असून या लिलावामध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही सभापती शंकर खेमनर यांनी केले आहे.

COMMENTS