Homeताज्या बातम्या

आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव

शिर्डीत ‘अन्नभेसळ’कडून हजारो किलो माल नष्ट; मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ
माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जि. प. शाळेची इमारत दुरवस्थेत; स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
कर्जत न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करणार – पालकमंत्री विखे पाटील

बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक उपक्रम सन २०२६-२७ अंतर्गत गावातील शेतकर्‍यांना सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषिदूत आदित्य कुर्‍हे, स्वप्नील शिंदे, आनंद शिंदे, रुधिर आघाव, सचिन वनवे, स्वप्नील काळे, रोहन आकोसकर, विकास पिंपळे, बालाजी पवार आणि यशपाल ओव्हाळ यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कृषिदूतांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर कसा करावा, त्याचे प्रमाण, वापरण्याची पद्धत तसेच पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी होणारे फायदे याबाबत माहिती दिली.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर होणारे परिणाम, उत्पादनात होणारी घट आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर समजावून सांगण्यात आला. आधुनिक शेतीमध्ये संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत उत्पादनवाढीसाठी मृदा आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन कृषिदूतांनी केले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एस. जी. बोरडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदितीजी सारडा, आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्यामजी भुतडा, कार्यक्रम समन्वयक डॉ. ब्रह्मदेव मुंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय सातपुते, ग्राम सहवास अधिकारी डॉ. एस. एस. एडके तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन मिळत आहे. कृषिदूतांच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेती उत्पादन वाढीसाठी निश्चितच मदत होणार आहे.

COMMENTS