Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौर ऊर्जेसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडयाने घेणार

उपमुख्यमंत्री फडणवीस ः प्रकल्पासाठी देणार हेक्टरी 75 हजार रुपये

पुणे/प्रतिनिधी ः राज्य सरकारने शेतकर्‍यांना 6 हजार सन्माननिधी देण्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरउर्जा प्रकल्पासाठी

मुंबईत सातशे कोटींचा करघोटाळा ; काँग्रेसचा सरकारला घरचा आहेर
महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात
FILMY MASALA : चुकीचा सल्ला देऊ नका’ म्हणत फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर lLokNews24

पुणे/प्रतिनिधी ः राज्य सरकारने शेतकर्‍यांना 6 हजार सन्माननिधी देण्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी सरकार भाडयाने घेणार असल्याचे सांगितले. तसेच जमिनीच्या बदल्यात शेतकर्‍यांना मोबादला दिला जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांना वर्षाला हेक्टरी 75 हजार रुपये देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पाउंडेशनच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसे काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला 75 हजार रुपये भाडे देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार. अस यावेळी फडणवीसांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, पाणी फाउंडेशनची गटशेती व्यवस्था पाहून गट शेती करण्यासाठी काहीतरी नवी योजना तयार करणे गरजेचे वाटते. शेतकरी दिवसा वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी आता करताना दिसत आहे. आता शेतकर्‍यांना दिवसाला बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी आता वीज पुरवठा करणारे फिडर सोलरवर करण्याचे काम हाती घेते आहोत. शेतकर्‍यांना वीज पुरवठा करणारे 30 टक्के फिडर आपण आता सोलारवर केले आहेत, असे ते म्हणाले. सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसे काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. नापीक असलेल्या भागातील शेतकर्‍यांची जमीन सौरउर्जा प्रकल्पासाठी करार पद्धतीने भाड्याने घ्यायला तयार आहोत. त्यासाठी वर्षाला 75 हजार रुपये देणार, त्यावर दर दोन वर्षांला दोन टक्के दर वाढ देणार, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरू केली. केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकर्‍यांच्या खात्यात 6 हजार रुपये टाकणार आहे. विम्याच्या हप्ता भरण्याची आवश्यकात नाही. जवळपास दीडलाख शेतकर्‍यांना शेततळे दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

जलसंधारणाशिवाय पर्याय नाही – राज्यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाग हा अर्वषणग्रस्त आहे. पाऊस कमी पडतो. त्यामुळे जलसंधारणाची गरज आहे. महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. बालेवाडीत पार पडणार पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रमात त्यांनीया कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान उपस्थित होते. बारा तास वीज देण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. आता निर्णय घेतला आहे की अ‍ॅग्रीकल्चर फीडर सोलरवर आणणार, त्यामुळे दिवसा बारा तास शेतकर्‍यांना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज – वाढत्या रासायनिक खतांमुळे जमीन नापिक होत असल्याची खंत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. रासायनिक वापरामुळे काळ्या आईची रोग प्रतिकारशक्ती कमी झालीय. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत हळू हळू कॅन्सर कॅपटील होत आहे. कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विषमुक्त शेतीली सुरुवात केलीयी. त्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. जवळपास यावर 3 हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. यातून आपली उत्पदक्ता वाढेल असा विश्‍वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS