Homeताज्या बातम्या

कांद्यासह भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत

शासनाने मदत करण्याची मागणी

धाराशिव प्रतिनिधी - सोयाबीनचा केवळ काढणी भाव तीन ते ४ हजार एक्कार आणि उत्पन्न ४ क्विंटल , हरभराही तीच गत म्हणुन पाणी असलेले बागायत शेतकरी

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन
पुस्तकांचे गाव भिलार पाठोपाठ महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर होणार पहिले मधाचे गाव
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशपातळीवरील 4 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

धाराशिव प्रतिनिधी – सोयाबीनचा केवळ काढणी भाव तीन ते ४ हजार एक्कार आणि उत्पन्न ४ क्विंटल , हरभराही तीच गत म्हणुन पाणी असलेले बागायत शेतकरी कांदा , कोथींबीर , वांगी , टमाटे यासह भाजीपाल्याकडे वळाले मात्र सध्या भाजीपाल्याचेही भाव गडगडले असुन कांदातर रडवतच आहे . वाणेवाडीच्या शेतकऱ्याने १ एक्कर पंचगंगा कंपनीचा कांदा लावला , कंपनीच्या बियाण्यात धोका झालाच पण त्याला खर्च सोडा काढलेल्या व बाजारात पाठवलेल्या कांद्याचे पदरून १३०० रूपये द्यावे लागले . कंपनीच्या सदोष बियाण्यामुळे त्याने आपल्या शेतातच असा कांद्या जाळूण टाकला व चांगला बाजारात पाठवला पण काढणीचा खर्चही निघाला नाही   त्यामुळे सर्वसामांन्यांचे व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असे म्हणणाऱ्या सरकारणे याकडे लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी होत आहे . तर भाजीपाल्याचे भाव एकदम पडीक असुन शेतकऱ्याला पदरून खर्च करावा लागत असल्याचे व्यापारी कलीम बागवान यांनी सांगीतले .

COMMENTS