अनुभवानेही शहाणपण येतेच असे नाही !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अनुभवानेही शहाणपण येतेच असे नाही !

 काॅंग्रेसचे अतिशय महत्वपूर्ण नेते असणारे अहमद पटेल यांच्या निधनानंतर  'काँग्रेस तेवीस' हा नवा गट जन्माला आला तो आता वाक्प्रचार म्हणून एकूण

द्वारकामाई साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी मुंबईत चित्ररथाचे आयोजन : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
राहुरीमध्ये आणखी एका पोलिस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा इशारा

 काॅंग्रेसचे अतिशय महत्वपूर्ण नेते असणारे अहमद पटेल यांच्या निधनानंतर  ‘काँग्रेस तेवीस’ हा नवा गट जन्माला आला तो आता वाक्प्रचार म्हणून एकूणच राजकीय चर्चेमध्ये येऊ लागला आहे. काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते यांचा एक गट तयार झाला असून त्यांची संख्या २३ आहे. या गटाने काँग्रेसच्या मूळ भूमिकेपासून काहीशी बंडखोरीची भूमिका योजल्याचे आपल्याला दिसते; गेल्या काही महिन्यांपासून हा खेळ सातत्याने सुरू आहे. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आजाद, कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम हे नेते वारंवार काहीतरी वक्तव्य करीत असतात. तसं पाहिलं तर आजाद यांचे यात काँग्रेस पेक्षाही भाजपशी जास्त सख्य सध्या असलेले आपल्याला दिसते. कपिल सिब्बल यांनी कालच वक्तव्य करीत एकूण काँग्रेसच्या भूमिकेवर काहीशी जाहीर टीका केली. तर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे पी. चिदंबरम यांनी उत्तर प्रदेश मध्ये प्रियंका गांधी यांनी केलेल्या कामगिरीवर टीका केलेली आहे,  तर दुसर्‍या बाजूला काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवड वेगाने व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्याशी काॅंग्रेसची युती होऊ शकते, असे वक्तव्यही केले. वास्तविक, आता, ममता बॅनर्जी आणि केजरीवाल हे संघाच्या आतील गोटाशी संधान साधून असल्याचे बोलले जाते, अशावेळी हे वक्तव्य आले आहे! खरेतर या काँग्रेस २३ नेत्यांना प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वापासून भीती जाणवते, अशी काहीशी सुप्त चर्चा निश्‍चितपणे पक्षीय पातळीवर आहे.  उत्तर प्रदेशचे राजकारण हे काँग्रेससाठी फार पूर्वीच बाद झालेले आहे; उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशात जाती बाहुल्याने ब्राह्मणांची इतर राज्यांच्या तुलनेने असणारी काहीशी अधिक संख्या आणि त्यामुळे होणारे जातीय शोषण यामुळे या राज्यात उघडपणे ब्राह्मणी नेतृत्वाच्या पक्षविरोधी राजकारणाला फार पूर्वीच सुरुवात झालेली आहे. परंतु यावर संघाने उपाययोजना करीत पक्षाचे नेतृत्व ब्राह्मण जातीकडून इतर जातील कडे त्यांनी खूप आधीच वर्ग केले आहे. तर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष आणि इतर तुलनेने ओबीसींचे आणि जाट समाजाचे लहान पक्ष यांची ताकद तेवढ्या प्रांतापुरती मर्यादित असल्यामुळे ते सत्तेच्या राजकारणापेक्षाही प्रतिनिधित्वाच्या राजकारणासाठी संघर्ष करतात. मात्र सपा आणि बसपा यांनी अवलंबलेला राजकीय व्यवहार भाजपने खूप आधीच आपल्या राजकीय पक्षाचा ध्येय धोरणाचा भाग बनवून यांच्यावर नेमकी मात केली. अशा या राजकीय माहोलमध्ये मधल्या जातींचे नेतृत्व सपाने केले, खालच्या जातींचे नेतृत्व बसपाने केले आणि वरच्या जातीचे नेतृत्व भाजपाने केले, असे उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे एकूण सूत्र दिसते. त्यामुळे देशाची आणि उत्तर प्रदेशची ही दीर्घकाळ सत्ता उपभोगलेला पक्ष म्हणून काँग्रेसकडे आता उत्तर प्रदेशची जनता फारशी आकर्षित होण्याचे कारणही दिसत नाही आणि तसा व्यवहारही होत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसचा प्रचार केला, सभा घेतल्या, जी वातावरणनिर्मिती केली ते पाहता आधीच्या चार जागा जरी त्यांना टिकवता आल्या नसल्या तरी सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रियंका गांधी यांच्या नावाची आणि नेतृत्वाची चर्चा निश्चितपणे काँग्रेससाठी फलदायी ठरेल यात, वाद असण्याचे कारण नाही. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस २३ मधून काँग्रेसच्या गांधी कुटुंबाच्या एकूणच नेतृत्व आणि त्यांच्या ध्येय धोरणावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका केली जात आहे. याचा पुन्हा पुरा अर्थ हाच घेतला जातो की काँग्रेस २३ मधले जवळपास सर्वच नेत्यांची जवळीकता ही काँग्रेस पक्षापेक्षाही भाजपच्या मागे सशक्तपणे उभ्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे, असा एक जण माणसांत प्रवाद निर्माण झाला आहे. हा प्रवाद तथ्यहीन आहे, असेही नाही. कारण काॅंग्रेस २३ च्या या नेत्यांनी ठरवले तर काॅंग्रेसला ते पूर्वीचे वैभव आणू शकतात. परंतु, त्यांना भीती ही वाटते की, राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे महत्त्व राहणार नाही, किंबहुना, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी त्यांना भीती वाटत असल्याने, ते संघाच्या वळचणीला राहणे पसंत करित आहेत! अर्थात, अनुभवाने शहाणपण येतेच, असे नाही, हाच अनुभव यातून दिसतो.

COMMENTS