Homeताज्या बातम्या

सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू

देवळाली प्रवरा  : राहुरी तालुक्यातील सडे येथील महादेववाडी परिसरात घरगुती वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घट

अहमदनगर : केडगावमध्ये ११ लाखांची सुगंधी सुपारी जप्त
नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट
Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)


देवळाली प्रवरा  : राहुरी तालुक्यातील सडे येथील महादेववाडी परिसरात घरगुती वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ७) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सडे येथील महादेववाडीमध्ये राहणारे साईनाथ बर्डे (वय ४८) हे रविवारी दुपारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी महादेव वस्ती जवळील मंदिर परिसरात त्यांचा लक्ष्मण माळी यांच्याशी वाद झाला. मद्यधुंद अवस्थेत साईनाथ बर्डे यांनी शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले.
 यावेळी लक्ष्मण माळी तसेच त्यांचे दोन साथीदार सागर सुभाष बर्डे आणि सुनील पवार यांनी साईनाथ बर्डे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीदरम्यान डोक्यावर लाकडी दांडक्याचा जोरदार फटका बसल्याने साईनाथ बर्डे गंभीर जखमी झाले. ते घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला.
घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी साईनाथ बर्डे यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.  
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस अधिकारी भाऊसाहेब शिरसाट तसेच हवालदार अर्जुन दारकोंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासाची कार्यवाही सुरू केली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कलम वाढविण्यात  कायदेशीर येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

COMMENTS