राऊत यांनी मिठाचा खडा टाकू नये ; अजित पवार, नबाब मलिक यांची सडेतोड टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राऊत यांनी मिठाचा खडा टाकू नये ; अजित पवार, नबाब मलिक यांची सडेतोड टीका

अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

Jalgaon : रोहिणी खडसे व एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन | LOKNews24
अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल
मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले |

मुंबई / प्रतिनिधी: अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. देशमुख यांनी स्वत: याबाबत भाष्य करण्याचे टाळले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही नेत्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला त्यांनी तिला आहे. 

पवार बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री करायचे हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसममध्ये कोणाला मंत्री करायचे, हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षांचे सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये.

देशमुख यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे राऊत यांनी त्यांच्या स्तंभात म्हटले होते.

देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल, असा टोलाही राऊत यांनी देशमुख यांना लगावला होता.

COMMENTS