Homeताज्या बातम्या

मंजूर पाईपलाईनची कामे पाच महिने प्रलंबित; मिलिंद सरपते यांचे मौन आंदोलन

बीड : बीड शहरातील विविध प्रभागांमध्ये मार्च 2026 मध्ये मंजूर झालेली पाईपलाईन व सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांची कामे पाच महिने उलटूनही सुरू न झाल्य

फसव्या कर्जमाफी आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळीबहुसंख्य शेतकरी राहणार वंचित असल्याचा आरोप
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची बैठक संपन्न

बीड : बीड शहरातील विविध प्रभागांमध्ये मार्च 2026 मध्ये मंजूर झालेली पाईपलाईन व सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांची कामे पाच महिने उलटूनही सुरू न झाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे शहर नेते मिलिंद सरपते यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) नगर परिषद कार्यालयासमोर मौन आंदोलन केले. प्रभाग क्र. 16 मधील राष्ट्रवादी भवन ते लेंडी नाला मार्गावरील पाईपलाईनचे काम मंजूर असूनही अद्याप सुरू झालेले नाही. याच मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने पाईपलाईनचे काम वेळेत न झाल्यास रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करून शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याची शक्यता सरपते यांनी व्यक्त केली. प्रभाग क्र. 1, 2, 3, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 25 व 26 मधील मंजूर पाईपलाईनची कामे तसेच प्रभाग क्र. 5, 8, 9, 11, 12, 14 व 25 मधील सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपमुख्याधिकारी तिडके यांनी सरपते यांचे निवेदन स्वीकारून पाणीपुरवठा विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. आंदोलनास वंचितचे माजी युवक जिल्हाध्यक्ष संतोष जोगदंड उपस्थित होते. दरम्यान, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जनहित धरणे आंदोलन – निधी वाचवा, पाईपलाईन सुरू करा’ आंदोलन करण्याचा इशारा मिलिंद सरपते यांनी दिला.

COMMENTS