Homeताज्या बातम्या

बीडसाठी विशेष पॅकेज द्या, खा.बजरंग सोनवणेंनी बीडकरांच्या मागण्या थेट मोदींकडे मांडल्या; दिल्लीत घेतली भेट, चार महापुरूषांना भारतरत्न देण्याची केली मागणी

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील संसद भवनात बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बीड जि

तुम्ही ग्रामीण भागात सेवा द्या, मी डाक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रात प्रयत्न करतो
घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले
खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पीएसआय सोमनाथ भुसारी यांचा जाहीर सत्कार; 33 वर्षांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेनंतर पदोन्नती

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील संसद भवनात बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्न, विकासाच्या प्रलंबित मागण्या आणि बीडकरांच्या अपेक्षा पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्या. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष केंद्रीय विकास पॅकेज मंजूर करण्याची आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली. बीड जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईतून दिलासा देण्यासाठी उजनी धरणातून मांजरा धरण व बीड जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ’वॉटर ग्रीड’ आणि जल हस्तांतरण प्रकल्पास केंद्रीय मदत देण्याची आग्रही मागणी सोनवणे यांनी केली. तसेच, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतील 2025-26 चे प्रलंबित पीकविमा दावे तातडीने निकाली काढणे आणि 2026-27 पासून ’ड-ऑन कव्हर’ पुन्हा लागू करण्याची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मौसमी व मोबाईल शाळांची व्यवस्था करणे आणि ऊसतोड कामगारांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यासाठी कृषी आधारित उद्योग, फूड प्रोसेसिंग, एमएसएमई आणि कौशल्य विकासाला चालना देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यासोबतच, धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करणे आणि जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी बीडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा सुरू करणे आणि अंबाजोगाई येथे 50 बेडचे ’क्रिटिकल केअर ब्लॉक’ मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली. तसेच शेतकर्‍यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एफपीओ, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस आणि कृषी प्रक्रिया केंद्रांचे जाळे मजबूत करण्यासह जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांचा केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी करण्यात आली. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ’प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’ अंतर्गत खासदारांना उपलब्ध असलेल्या वार्षिक प्रकरणांच्या कोट्यात वाढ करण्यात यावी, तसेच सध्या उपचारासाठी उपलब्ध असलेली 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी खा.सोनवणे यांनी या भेटीत केली. दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ’भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाच्या आठही खासदारांच्या वतीने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली.

COMMENTS