बीड : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता बीड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी वाहन चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्
बीड : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता बीड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी वाहन चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतुक कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व खुले करण्यात आले आहे. तरी बीड जिल्ह्यातील पात्र चालकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांनी केले आहे. 20 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसह टॅक्सी, कॅब, अॅप-आधारित ओला-उबर सेवा, पर्यटन वाहने तसेच इतर सर्व प्रवासी वाहने चालविणारे चालकही मंडळाचे सदस्य होऊ शकणार आहेत. सदस्यत्व घेतल्यानंतर पात्र चालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असून, या निर्णयामुळे राज्यातील हजारो अॅप-आधारित कॅब चालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रवासी वाहन चालकांनी विलंब न करता कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्वासाठी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा कार्यालयात सदस्यत्व नोंदणीसाठी अर्ज करावा. प्रवासी चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी हे सदस्यत्व महत्वाचे आहे. सर्व पात्र चालकांनी नोंदणी करुन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS