मुंबई : सार्वजनिक बांधकाम पालघर विभागामध्ये कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव यांनी या विभाग आणि उपविभागातील आदिवासींच्या पा
मुंबई : सार्वजनिक बांधकाम पालघर विभागामध्ये कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव यांनी या विभाग आणि उपविभागातील आदिवासींच्या पायाभूत सोयी-सुविधांचा विकास निधी कोणतेही कामे न करता अपहार केला असून, याप्रकरणी दैनिक लोकमंथनने यापूर्वीच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून, यासंदर्भात आता आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत.
पालघर विभागात तसेच डहाणू आणि पालघर उपविभागात विविध शासकीय योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. विशेषतः आदिवासी विकासासाठी मंजूर झालेल्या निधीचा उद्देशाप्रमाणे वापर न होता त्या निधीचा अपहार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यात बोगस कामांची देयके अदा करणे, बोगस निविदा, बोगस कामे या सर्व बाबी दाखवून उप अभियंता अजय जाधव यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी लाटल्याचे दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 300 कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर झाली होती. या कामांमध्ये जिल्हा नियोजन विकास कार्यक्रम, विशेष दुरुस्ती, देखभाल आणि आदिवासी विकास योजनांचा समावेश होता. मात्र अनेक कामांमध्ये निविदा प्रक्रियेत अनियमितता, अपूर्ण कामांना देयके अदा करत कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, आणि उप अभियंता अजय जाधव या दोघांनी संगनमताने कोट्यावधी रूपयांचा निधींचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही अधिकार्यांनी काही निविदा संगनमताने मंजूर करून शासकीय निधीचा अपहार केला आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेचे लेखापरीक्षण करून सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच, उपअभियंता अजय जाधव यांनी सेवाकाळात त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मोठी संपत्ती उभी केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेची चौकशी करून आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यात यावा आणि आवश्यक असल्यास आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाकडे करण्यात आली आहे.
एकाच विभागात ठाण मांडून का?
उपअभियंता अजय जाधव यांची याच विभागात वारंवार नियुक्ती होत असल्याने अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी प्रभाव निर्माण झाला असून त्याचा गैरफायदा घेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी विभागीय तसेच स्वतंत्र खातेनिहाय चौकशी करून या अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
अभियंता अजय जाधव वर फौजदारी गुन्हा दाखल करावा
उपअभियंता अजय जाधव यांनी आदिवासी विकास निधीवर डल्ला मारत एकप्रकारे इथल्या शोषित-पीडित असलेल्या समूहाच्या हक्कांवर गदा आणली आहे. त्याचप्रकारण आम्ही उप अभियंता अजय जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.

COMMENTS