Homeताज्या बातम्या

संसदेत राहुल गांधींचा अमित शाहांवर गंभीर आरोप

लोकसभेत आज मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पेलेट गनचा वापर कर

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांच्या दोन भव्य प्रकल्पांची घोषणा!
देशात संविधान  उरले नाही : खा. राऊत
कारगील विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून शहीद वीरांना कृतज्ञ अभिवादन
Akhilesh Yadav and Rahul Gandhi : राहुल गांधींकडून संसदेत अमित शाहांवर गंभीर  आरोपांच्या फैरी, भाजपकडून जोरदार पलटवार होताच अखिलेश यादव मदतीला धावले ...

लोकसभेत आज मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचा गंभीर आरोप केला.राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींना आरोपांचा पुरावा सादर करण्याचे आवाहन करत, अन्यथा सभागृहात माफी मागावी, अशी मागणी केली.यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव राहुल गांधींच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्यांनी सरकारला सवाल करत, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज नेमका कोणाच्या आदेशाने झाला, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी केली.यावर किरेन रिजिजू यांनी उत्तर देताना, चौकशीची मागणी मान्य असल्याचे सांगितले. मात्र राहुल गांधी यांनी केलेले आरोप गंभीर असून त्यांना त्याचा पुरावा द्यावा किंवा माफी मागावी, अशी भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत, ते सभागृहात उपस्थित नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी चर्चेचा विषय वेगळा असल्याचे सांगत राहुल गांधींना विषयावर बोलण्याचे निर्देश दिले.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे लोकसभेत काही काळ गदारोळ, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. राहुल गांधींच्या आरोपांवर सरकार काय भूमिका घेते आणि या प्रकरणी पुढे काय घडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS