Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

इराण-अमेरिका युद्ध संपण्याची चिन्हे!; पुढील 48 तासांत युद्धविराम घोषणेची शक्यता; दोन्ही देशांमध्ये 14 कलमी आराखडा तयार

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष आता निवळण्याच्या दिशेने वेगाने सरकत असून पुढील 48 तासांत युद्धविरामाची घोषणा होण्याची

होर्मुझची पुन्हा नाकेबंदी !
इराणने अणुकार्यक्रम थांबवावा अन्यथा करार अशक्य; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ठाम भूमिका
अमेरिका-इराणची पुढील चर्चा जिनिव्हात होण्याची शक्यता
अमेरिका-इराण युद्ध समाप्तीचा करार | US-Iran War Ending MOU Details in  Marathi

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष आता निवळण्याच्या दिशेने वेगाने सरकत असून पुढील 48 तासांत युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमध्ये 14 कलमी प्राथमिक कराराचा मसुदा तयार झाला असून, तो अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.
या प्रस्तावानुसार, सर्वप्रथम दोन्ही बाजूंनी शत्रुत्व थांबवण्याची घोषणा केली जाईल. त्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत सविस्तर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. या चर्चांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक, इराणचा अणुकार्यक्रम आणि अमेरिकेचे निर्बंध हे प्रमुख मुद्दे असतील. चर्चेसाठी इस्लामाबाद किंवा जिनिव्हा या ठिकाणांचा पर्याय विचाराधीन आहे. कराराच्या अटींनुसार, इराण काही काळासाठी अणुकार्यक्रम थांबवण्यास तयार असल्याचे संकेत आहेत. त्याबदल्यात अमेरिका टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करेल आणि इराणची गोठवलेली आर्थिक मालमत्ता मुक्त करेल. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील निर्बंध सैल करून सागरी वाहतूक सुरळीत करण्यावरही भर दिला जाणार आहे. मात्र अणुकार्यक्रम किती काळ स्थगित ठेवायचा यावर अजूनही मतभेद कायम आहेत. इराणने पाच वर्षांचा प्रस्ताव दिला असताना अमेरिकेने वीस वर्षांची अट मांडली होती. सध्या या कालावधीवर मध्यममार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असून, 12 ते 15 वर्षांचा पर्याय चर्चेत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. इराणकडून संयुक्त अरब अमिरातीवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली, मात्र तो निष्फळ ठरल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकेने आपल्या युद्धनौकेला होर्मुझ परिसरात तैनात केले असून, अडकलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यावर भर आहे. इराणच्या क्रांतिकारी रक्षक दलाने जाहीर केले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची हालचाल आता सुरक्षित राहील. नवीन नियमांनुसार, सामान्य व्यापारी जहाजांना मार्ग दिला जाईल; मात्र लष्करी मालवाहतूक करणार्‍या जहाजांवर नियंत्रण ठेवले जाईल. संघर्ष निवळण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. एका दिवसातच सुमारे सहा ते सात टक्क्यांनी दर खाली आले. तज्ज्ञांच्या मते, करार झाल्यास तेलपुरवठा वाढून किमती आणखी कमी होऊ शकतात.

14 कलमी करारातील प्रमुख मुद्दे
तात्काळ युद्धविराम, पुढील चर्चांसाठी निश्‍चित कालमर्यादा, होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरू ठेवणे. अणुकार्यक्रमावर तात्पुरती स्थगिती, निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता, गोठवलेली आर्थिक मालमत्ता मुक्त करणे, अणुशस्त्रनिर्मिती न करण्याची हमी, आंतरराष्ट्रीय निरीक्षण यंत्रणेला अधिक अधिकार, अचानक तपासण्यांना परवानगी, उच्च दर्जाच्या युरेनियम साठ्याचे निर्गमन, भूमिगत प्रकल्पांवर नियंत्रण, मर्यादित पातळीवर युरेनियम प्रक्रिया करण्याची परवानगी, अटींचे उल्लंघन झाल्यास कालावधी वाढवण्याची तरतूद, भविष्यातील व्यापक करारासाठी मार्गदर्शक आराखडा या 14 कलमांचा या करारात समावेश आहे.

COMMENTS