Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनीच्या डॉ लोंढे ,डॉ. चव्हाण व डॉ. गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

संगमनेर प्रतिनिधी  अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीएचे प्राचार्य डॉ बी एम लोंढे , फार्मसीचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण व अमृतवाहिनी इंजिनिअरि

पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन
तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार | DAINIK LOKMNTHAN
नगरच्या उपनगरांची भुयारी गटार योजना अडकली वादात

संगमनेर प्रतिनिधी  अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीएचे प्राचार्य डॉ बी एम लोंढे , फार्मसीचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण व अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागाचे डॉ जे बी गुरव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.

विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विविध विभागांना एनबीएचे मानांकन मिळाले असून इंजिनिअरिंग कॉलेजला नेक चा अ दर्जा मिळाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विविध विभाग हे उच्चतम गुणवत्तेमुळे अग्रमानांकित ठरले आहे. पुणे विद्यापीठातील ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट या व्यवस्थापन शाखेच्या अभ्यास मंडळावर एमबीएचे प्राचार्य डॉ बी एम लोंढे यांची निवड झाली आहे .तर फार्मा कोगनन्सी फार्मसी शाखेच्या विषयात अभ्यास मंडळावर प्राचार्य डॉ एम.जे. चव्हाण यांची निवड झाली आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यास मंडळावर डॉ. जे बी गुरव यांची निवड झाली आहे

या निवडीचे संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख ,इंद्रजीत भाऊ थोरात ,कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. विवेक धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे

COMMENTS