Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!

नाशिक : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात 22 किलो चांदीची तफाव

शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ
नांदेड शहरात 24 तासात दुसरा खून
पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहात पकडला
खळबळजनक! सप्तश्रृंगी गडावर मोठी चोरी; देवीच्या मंदिरातून २२ किलो चांदी  लंपास!

नाशिक : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात 22 किलो चांदीची तफावत आढळल्याने खळबळ उडाली. या चांदी अपहार प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत आता सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये 406 किलो चांदीचा उल्लेख असताना, प्रत्यक्षात करण्यात आलेल्या मोजणीत मात्र केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले असून, यातून तब्बल 22 किलो 490 ग्रॅम चांदीचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.

COMMENTS