Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेरूळमध्ये शहर बसच्या इंजिनचा स्फोट

छ. संभाजीनगर : वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी शहर बसच्या इंजिनमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण

चंदगडला निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सचा भोंगळ कारभार,प्रवाशांची गैरसोय
एसटीचा नवा ‘लय भारी’ लूक! रितेश आणि जेनेलिया आता ‘लालपरीचे ब्रँड ॲम्बेसडर’
पाथर्डी – गेवराई बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकात उत्साह
Verul Bus Stand Engine Explosion; Smart City Bus Incident

छ. संभाजीनगर : वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी शहर बसच्या इंजिनमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने त्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. छत्रपती संभाजीनगर-वेरूळ मार्गावरील ही बस तांत्रिक बिघाडामुळे बसस्थानकात उभी करून दुरुस्ती सुरू होती. त्याचवेळी इंजिनमधून अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच दाट धूर बाहेर पडू लागला. या अनपेक्षित घटनेमुळे बसस्थानक परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

COMMENTS