Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा शाळेत आंनद मेळावा उत्साहात

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना व्यावाहरीक ज्ञान मिळण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे

अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू
परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
केडगावच्या दोघांची पोलिसांनी केली चौकशी ; पत्रकार बोठेला मदत केल्याचा संशय

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना व्यावाहरीक ज्ञान मिळण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा आनंद घेत मोठी आर्थिक उलाढाल केली आहे.
                   बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते खरेदी करुन करण्यात आले. यावेळी मुंबई मंञालयातील सेवानिवृत्त सचिव दत्ताञय पाटील कडू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे, रंजना कांबळे, नानासाहेब होले, मुख्याध्यापिका मंगल पठारे, जालिंदर मुसमाडे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध खाद्य पदार्थ व चाँकलेट, भाजीपाला, पाणी पुरी, ओलीसुकी भेळ, चना मसाला, पापड, वडे, गोलगप्पे, शाबुदाणा वडे, इडली, घावण असे विविध पदार्थ बाल आनंद मेळाव्यात विक्रीसाठी आणले होते. शालेय विद्यार्थी व पालक यांनी खरेदीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी शेतातील ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता.भाजीपाला खरेदीसाठी पालकांची झुंबड उडाली होती.अवघ्या दहा मिनिटात भाजीपाला संपला. यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी खरेदीचा आनंद लुटला तर आपल्या पदार्थाची विक्री होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. खरेदी विक्रीच्या व्यवहरातुन विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञानाचा अनुभव घेता आला. बाल आनंद मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक व मुख्याध्यापिका मंगल पठारे, शिक्षक सुनिता मुरकुटे, स्वाती पालवे, शिवाजी जाधव, भारती पेरणे, सुप्रिया आंबेकर, अर्जुन तुपे, वनिता तनपुरे, लक्ष्मी ऐटाळे, सुभाष अंगारखे, हसन शेख, जकिया इनामदार उपस्थित होते.

COMMENTS