Homeताज्या बातम्या

गजानन विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगासनांद्वारे निरोगी आयुष्याचा दिला संदेश

नवगण राजुरी: येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात वि

पारधी समाजातील महिलेवर जीवघेणा हल्ला; विनयभंग, लूट व बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा होणार निर्णय! सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; पुढील सुनावणी ४ ऑगस्टला
१ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम; एलपीजी दरांपासून ते आयटीआर अन् रेल्वे तिकिटांपर्यंत तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

नवगण राजुरी: येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विशेष योगासने सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संस्थापिका स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी योग गुरू म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत पवळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे फायदे सांगून निरोगी आयुष्य कशाप्रकारे जगता येते, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनानंतर मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात शरीरातील विविध अवयव सदृढ करणारी योगासने कृतीतून करून पाहिली. या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शिंदे एस. एस., पर्यवेक्षक दगडे व्ही. एन., शेख एस. वाय., भोसले बी. एस. यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप सरवदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

COMMENTS