Homeताज्या बातम्या

मोबाईलपेक्षा अभ्यासात सातत्य ठेवा :  लखवाल

शहरटाकळी :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गोगलगाव येथे सुरू असलेल्या कामाच्या निमित्ताने नेवासा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी भेट दिली. या भेटीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गोगलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय प्रशासकीय कामकाज , वनराई बंधारे व जलतारा या कामांची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या भेटीत गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची मुक्तहस्ते संवाद साधला. यावेळी बोलताना संजय लखवाल यांनी सांगितले की , विद्यार्थ्यांनी आता मोबाईल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासात सातत्य ठेवून भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करावे व गोगलगाव या गावाचा नावलौकिक उंचवावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना सातत्यपूर्ण काम चालू ठेवणे बाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक गोविंदराव मते, ग्रामपंचायत अधिकारी बापूसाहेब राजळे, मुख्याध्यापक नवथर,पवार,गव्हाणे, बनकर, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

सविता पिसाळ यांना पीएच.डी. पदवी
देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार
महायुती सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर

शहरटाकळी :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गोगलगाव येथे सुरू असलेल्या कामाच्या निमित्ताने नेवासा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी भेट दिली. या भेटीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गोगलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय प्रशासकीय कामकाज , वनराई बंधारे व जलतारा या कामांची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या भेटीत गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची मुक्तहस्ते संवाद साधला. यावेळी बोलताना संजय लखवाल यांनी सांगितले की , विद्यार्थ्यांनी आता मोबाईल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासात सातत्य ठेवून भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करावे व गोगलगाव या गावाचा नावलौकिक उंचवावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना सातत्यपूर्ण काम चालू ठेवणे बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक गोविंदराव मते, ग्रामपंचायत अधिकारी बापूसाहेब राजळे, मुख्याध्यापक नवथर,पवार,गव्हाणे, बनकर, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

COMMENTS