Homeताज्या बातम्या

वाचकाचे प्रेम! दिसताक्षणी गळा भेट घेत नाश्त्याचा आग्रहजामखेडचे अख़ील शेख; एक दर्दी वाचक!

बीड (प्रतिनिधी) - गेल्या काही वर्षांपासून भलेही अनेक लोक म्हणत असतील की, सोशल मीडियामुळे वृत्तपत्र वाचकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. मात्र आजही

 सहकारभारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी हजारे
लाठ्याकाठ्यांनी मारहाण; उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू; पिंपळगाव उंडा येथील घटना; मुख्य आरोपी अटकेत
जामखेडमध्ये नर्सची स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या   

बीड (प्रतिनिधी) – गेल्या काही वर्षांपासून भलेही अनेक लोक म्हणत असतील की, सोशल मीडियामुळे वृत्तपत्र वाचकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. मात्र आजही वृत्तपत्रांचे अनेक दर्दीवाचक आहेत. अशाच वाचकांमध्ये जामखेड येथील झैन-हुर परफ्यूम चे मालक/संचालक अख़ील शेख हेही एक होय. ते भलेही अहेमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याचे रहिवासी असले तरी बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणारी वृत्तपत्रे सुद्धा आवर्जून वाचतात.
               बीड शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी लिहिलेल्या बातम्या असो की लेख ते न चुकता वाचतात. नुकतेच एस.एम.युसूफ़ हे अहेमदनगरहून बीडकडे प्रवास करत असताना अख़ील शेख यांनी त्यांची जामखेड बस स्थानकात आवर्जून भेट घेतली आणि नाश्ता करण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातर एस.एम.युसूफ़ यांनी जामखेड येथे नाष्टा केला. अख़ील शेख यांनी यादरम्यान वृत्तपत्र आणि पत्रकारितेविषयी एस.एम.युसूफ़ यांच्याशी मनसोक्त चर्चा केली.
                या प्रसंगामुळे दिसून आले की, भले कितीही सोशल मीडियाचा जमाना येवो वृत्तपत्राच्या शाश्वततेला पर्याय नाही. वृत्तपत्रांमुळेच एका जिल्ह्यात पत्रकारिता करणार्‍या पत्रकाराला दुसर्‍या जिल्ह्यातील वाचक वाचतात, अनुभवतात. स्पष्ट व खर्‍या लेखणीला मान देतात. ज्यामुळे दोघांचा संपर्क झाल्यास एकमेकांविषयी आपुलकी व प्रेम वाढते. याचाच प्रत्यय जामखेड येथे एस.एम.युसूफ़ आणि अख़ील शेख यांच्या भेटीदरम्यान आला.

COMMENTS