Homeताज्या बातम्या

’शाम-ए-रफी’ गायन स्पर्धेत मज़हरुद्दीन शेख सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित; बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

बीड: हिंदीसह अनेक भाषांमध्ये आपल्या सुमधुर गाण्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे महान पार्श्वगायक मरहूम मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यति

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील अर्ज न्यायालयाकडून नामंजूर; ॲड. राहुल सोळंके यांनी केली गैरअर्जदाराची बाजू
कुंडलवाडी येथे ऐतिहासिक श्री राम मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश

बीड: हिंदीसह अनेक भाषांमध्ये आपल्या सुमधुर गाण्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे महान पार्श्वगायक मरहूम मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई येथे आयोजित ’शाम-ए-रफी’ या प्रतिष्ठित गायन स्पर्धेत बीडचे सुपुत्र मज़हरुद्दीन शेख यांनी अप्रतिम यश संपादन केले आहे. बीड शहरातील प्रसिद्ध गायक तथा मुस्लिम समाजातील पहिले संगीत विशारद मज़हरुद्दीन शेख यांनी या स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट गायक’ हा मानाचा पुरस्कार पटकावून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

एसवायएनए प्रॉडक्शनच्या वतीने सलीम शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबईतील गोरेगाव येथील सुर्वे स्टुडिओमध्ये रविवारी, २६ जुलै २०२६ रोजी ही स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेत मुंबईसह राज्यभरातून अनेक नामवंत गायकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत मज़हरूद्दीन शेख यांनी ‘बैजू बावरा’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील ’तू गंगा की मौज मै जमना का धारा’ हे कठीण गाणे अत्यंत शास्त्रशुद्ध व सुमधुर आवाजात सादर केले. त्यांच्या या गायकीने उपस्थित रसिक श्रोत्यांसह परीक्षकांचीही मने जिंकली. मोहम्मद रफी साहेबांचे चिरंजीव मोहम्मद शाहिद रफी यांच्या हस्ते मज़हरूद्दीन शेख यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मज़हरूद्दीन शेख यांनी मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, संगीत क्षेत्रातील कलाकार, तसेच बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

COMMENTS