Homeताज्या बातम्या

सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नांदेड : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण य

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनास केजकरांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध!
बँक ऑफ बडोदाचा १ TB डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप; ग्राहकांची महत्त्वाची माहिती धोक्यात? बँकेचा खुलासा
सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाणी थेट हॉटेलमध्ये! कुरुंदवाडमधील किळसवाण्या प्रकाराने कोल्हापुरात खळबळ; नगरपरिषदेची नोटीस

नांदेड : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.

विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान बोलताना आमदार चिखलीकर यांनी, महिला लोकप्रतिनिधींविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब असल्याचे सांगितले. महिला नेत्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. राजकीय मतभेद असले तरी महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महिला लोकप्रतिनिधींविषयी अशा प्रकारची वक्तव्ये तातडीने थांबवावीत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात माजी आमदार तथा शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, तसेच पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडीचे कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS