Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाद्यतेलाच्या किंमतीत 10 रूपयांची वाढ

छ. संभाजीनगर : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा आणि जागतिक संघर्षाचा फटका आता थेट स्थानिक बाजारपेठेला बसू लागला आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या दरात गेल

सिटी बसच्या इंजिन चा भीषण स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
‘चर्चेतील चेहरा’ कार्यक्रमात आदर्श सरपंच मयुर आंधळे यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित; प्रसिद्ध रामा इंटरनॅशनल हॉटेल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात झाला गौरव
सीएम फंडातून आशाबाई शिंदे यांना 60 हजारांची मदत; आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश

छ. संभाजीनगर : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा आणि जागतिक संघर्षाचा फटका आता थेट स्थानिक बाजारपेठेला बसू लागला आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत लक्षणीय वाढ झाली असून सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या किमतीत प्रति लिटर सुमारे दहा रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होऊन घरगुती अर्थकारणावर ताण निर्माण झाला आहे.
शहरात दररोज सुमारे शंभर टन खाद्यतेलाची गरज भासते. मात्र सध्याच्या परिस्थितीत आयात मंदावल्यामुळे केवळ सत्तर टनच पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. या तुटवड्यामुळे पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून समुद्री वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आयात होणार्‍या खाद्यतेलाचा खर्च वाढून त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसत आहे. व्यापारी राकेश पांडे यांच्या मते, सूर्यफूल तेल मोठ्या प्रमाणावर रशिया आणि युक्रेनमधून, पामतेल मलेशियातून, तर सोयाबीन तेल अर्जेंटिना व ब्राझीलमधून आयात होते. सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे या सर्व पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. दरवाढीच्या या पार्श्‍वभूमीवर स्थानिक बाजारातून मात्र एक दिलासादायक बाब समोर आली आहे. करडीचे नवीन पीक बाजारात दाखल झाल्यामुळे करडी तेलाच्या दरात वीस रुपयांची घट झाली आहे. सध्या सुमारे 300 रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे करडी तेल आगामी काळात 250 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. जागतिक घडामोडींचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. खाद्यतेलासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत होत असून, परिस्थिती स्थिर होईपर्यंत नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

COMMENTS